महाराष्ट्रात उलथापालथ करणाऱ्यांना त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही; शरद पवारांनी ठणकावलं

महाराष्ट्रात उलथापालथ करण्याची भूमिका ज्याप्रवृत्तींनी घेतली त्यात दुर्दैवाने आपले सहकारी बळी पडले. जे घडले त्यानंतर फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातील सामान्य माणूस एक वेळ उपाशी राहील पण राज्याची सामूहिक शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. या माध्यमातून उलथापालथ करणारा जो वर्ग आहे त्यांना त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ठणकावून सांगितले. वर्षभराने पुन्हा लोकांसमोर जायची संधी येईल त्यावेळी राज्यातील लोकशाहीच्या मार्गाला, शांततेवर विश्वास असणाऱ्या शक्तींना धक्का देणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांना पूर्णपणे बाजूला करूया आणि पुन्हा एकदा प्रगतीशील आणि सामान्य माणसाच्या हितासाठी कष्ट करणाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य निर्माण करूया असे आवाहनही त्यांनी कराड येथे बोलताना केले.

पक्षामध्ये फूट पडल्यानंतर सोमवारी सकाळी शरद पवार यांनी स्व. यशवंतराव चव्हाणसाहेबांचे स्मृतिस्थळ असलेल्या प्रीतिसंगमावर येऊन अभिवादन केले. यशवंतराव चव्हाणसाहेबांचे वैशिष्ट्य होते की, सामान्य माणसांचा अधिकार जतन केला पाहिजे. या राज्यात त्यांनी नवी पिढी तयार केली.जिल्हयाजिल्ह्यात तरूणांचा संच उभा केला. या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रगतीची अखंड काळजी घेतली. आज चव्हाणसाहेब जरी आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेले विचार हे तुमच्या माझ्या अंत:करणात आहेत. त्या विचाराने पुढे जाण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतली असेही शरद पवार म्हणाले.

आज महाराष्ट्रात आणि देशात जाती-धर्मात, माणसा-माणसांत संघर्ष कसा होईल याची काळजी घेणारा एक वर्ग आहे. महाराष्ट्र हा बंधुत्व, इमान राखणाऱ्यांचा सन्मान करणारे राज्य आहे. पण मध्यंतरीच्या कालखंडात याच महाराष्ट्रात कोल्हापूर, संगमनेर, अकोला अशा काही ठिकाणी पिढ्यानपिढ्या एकत्र राहणाऱ्या समाजात एक प्रकारची वैरभावना वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यातून जातीय दंगे झाले जे महाराष्ट्राला शोभणारे नाहीत अशी तीव्र नाराजीही शरद पवार यांनी व्यक्त केली.

पहिला मोहरा परत..! मी साहेबांसोबत.!! अमोल कोल्हेंचे ट्विट, अजित पवारांना पहिला धक्का

महाविकास आघाडी सरकारमार्फत राज्याची सेवा होत असताना ते सरकार या ना त्या पद्धतीने उलथून टाकण्याचे काम काही लोकांनी केले. केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात इतर ठिकाणीही असे करण्यात आले. चुकीच्या प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत. त्याच प्रवृत्तींनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चव्हाणसाहेब यांच्या महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या राजकीय पक्षाला एक प्रकारचा धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व जातीय आणि तत्सम विचारधारा आहेत, यातून देशाचा कारभार पुढे नेण्याचा प्रयत्न होतोय असेही शरद पवार म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)