विमानातील टॉयलेटमध्ये गेला आणि आतच अडकला, दीड तास कमोडवर बसून राहिला

स्पाईसजेटच्या विमानातील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. विमानातील टॉयलेटचा दरवाजा लॉक झाल्याने एक  प्रवासी जवळपास 100 मिनिटे आतच फसला. ही घटना मुंबई बंगळुरु फ्लाईटमध्ये घडली आहे. केम्पेगोडा आतंरराष्ट्रीय विमानतळावर इंजिनीअरच्या मदतीने टॉयलेटचा दरवाजा तोडल्यानंतर बाहेर आला. टॉयलेटमध्ये फसल्यानंतर तो अस्वस्थ झाला. तो उड्डाणाच्या वेळी घाबरला होता,. केआयए सुत्रांनी सांगितले की, ही घटना फ्लाईट एसजी 268 मध्ये घडली. मंगळवारी सकाळी 2 वाजता या विमानाने मुंबईतून उड्डाण केले होते.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हे विमान सोमवारी रात्री 10.55 वाजता उड्डाण करणार होते. विमानातील त्या प्रवाशाबाबत अद्याप काही माहिती मिळालेली नाही. तर एअरलाईन्स कंपनी स्पाईसजेटनेही आतापर्यंत काही प्रतिक्रिया दिलेली नाही. वृत्तानुसार, केआईएच्या एका स्टाफला हे आधीपासून माहित होते की, 14 डी सीटवर बसलेला प्रवासी विमानाने उड्डाण केल्यानंतर लगेच टॉयलेटमध्ये गेला होता. त्यावेळी सीट बेल्ट घालण्याची वेळ संपली होती. वाईट गोष्ट म्हणजे टॉयलेटचा दरवाजा नादुरुस्त असल्याने प्रवासी आतच अडकला.

आत अडकल्यानंतर प्रवासी घाबरला आणि तो जोरजोरात ओरडू लागला, त्यावेळी क्रू मेंबर्स त्या दिशेने धावले. त्यांनी बाहेरुन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते असमर्थ ठरल.  बंगळुरुच्या विमानतळावरील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बिचाऱ्या त्या प्रवाशाला मुंबई ते बंगळुरुचा प्रवास टॉयलेटमध्येच बसून करावा लागला. विमान आकाशात होते. क्रू मेंबर्सनी अनेक प्रयत्न करुनही दरवाजा खोलता आला नाही,. त्यानंतर एका एअर हॉस्टेसने एका कागदावर मोठ्या अक्षरात लिहीले की, सर, आम्ही दरवाजा उघडण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला, पण आमच्याकडून तो खोलला जात नाहीय. तुम्ही घाबरु नका, काही मिनिटांमध्येच आपण लॅण्ड करणार आहोत. त्यामुळे आता कमोडचे झाकण बंद करुन त्यावर बसा आणि स्वत:ला सुरक्षित ठेवा. जसा मेन गेट खोलेल तसा इंजिनीअर येतील असे त्यांना त्या नोटमध्ये सांगतिले होते.

क्रू मेंबरने दरवाज्यातून प्रवाशाला एक नोट  दिली. यानंतर फ्लाइट पहाटे 3.43 वाजता लँण्ड झाले आणि त्यानंतर इंजिनियर विमानात चढले, दरवाजा तोडला आणि दोन तासांच्या मेहनतीनंतर त्या व्यक्तीला अखेर वाचवले. यानंतर प्रवाशाला तातडीने प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. क्लस्ट्रोफोबियामुळे प्रवासी पूर्णपणे शॉकमध्ये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.