Stock Market – एक करार अन् रॉकेट बनला ‘हा’ शेअर, 6 महिन्यात गुंतवणुकदारांचे पैसे झाले डबल

शेअर मार्केटमध्ये सध्या तुफान तेजी दिसून येत असून पुढील वर्षापर्यंत सेन्सेक्स 75 हजारांची पातळी गाठेल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे मल्टिबॅगर शेअरसह स्मॉल आणि मिडकॅप शेअरमध्येही खरेदी सुरू आहे. त्यामुळे शेअर्सच्या किंमतीही वाढत असून गुंतवणुकदारांना चांगला परतावा मिळाल्याने ते मालामाल होत आहे. ऑटो, इलेक्ट्रिक वाहनं आणि ग्रीन एनर्जीशी संबंधित शेअरची चलती असून यापैकीच एका शेअर रॉकेट बनण्याच्या तयारीत आहे.

ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये काम करणारी कंपनी सब्सिडीअरी फर्म एसजेव्हीएन ली. (SJVN share price) या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे अवघ्या 6 महिन्यात दुप्पट झाले आहेत. कंपनीला चांगल्या ऑर्डर मिळत असल्याने शेअरमध्ये तेजी दिसत आहे. गेल्या शुक्रवारीही हा शेअर 1.22 टक्क्यांनी वाढून 76.09 रुपयांवर पोहोचला.

गेल्या 6 महिन्यामध्ये सब्सिडीअरी फर्म एसजेव्हीएन ली. (SJVN share price) या शेअरने गुंतवणूकदारांना 113.8 टक्के एवढा जबरदस्त परतावा दिला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात 100 टक्के परतावा देणाऱ्या शेअरमध्ये या शेअरचाही समावेश झाला आहे. 19 मे, 2023 रोजी एसजेव्हीएन शेअरची किंमत 35.65 रुपये होते. अवघ्या 6 महिन्यात यात 40.35 रुपयांची वाढ झाली.

याचाच अर्थ मे मध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने या कंपनीमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याचे आता 2 लाख रुपये झाले असतील. या शेअरची 52 वीक हाय लेव्हर 83.65 रुपये असून 52 वीक लो लेव्हल 30.40 रुपये आहे. गेल्या पाच वर्षाचा विचार केल्यास एसजेव्हीएन शेअरने 181 टक्के परतावा दिला आहे.

एसजेव्हीएनचा शेअर वाढण्यामागे या कंपनीला मिळणाऱ्या प्रोजेक्टचा हात आहे. पवन परियोजनेसाठी करार झाल्यानंतर हा शेअर तुफान पळतोय. एसजेव्हीएन ली.ची पॅरेंट कंपनी एसजेव्हीएन ग्रीन एनर्जीसोबत सरकारच्या मालकीच्या एका कंपनीने करार केला आहे. 1400 कोटी रुपयांचा हा करार असून याद्वारे 482 मिलियन युनिट विजेच्या निर्मितीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे आगामी काळात हा शेअर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.