इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत राहुलचे ग्लोव्हज इशानच्या हातात

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघात स्थान न मिळणाऱ्या  इशान किशनबाबत अनेक गोष्टी कानावर पडत असल्या तरी त्या अफवाच ठरणार आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी के. एल. राहुलच्या जागी यष्टिरक्षक म्हणून इशान किशनची वर्णी लागणार आहे. हे ऐकून कुणालाही धक्का बसेल, पण राहुलला वगळून इशानला संधी मिळणार नाही.

राहुलही संघात असेल फक्त त्याला यष्टिरक्षकाच्या अतिरिक्त जबाबदारीतून मुक्त केले जाणार आहे. त्याला आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करता यावे म्हणून बीसीसीआय हा पर्याय वापरणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले आहे. त्यामुळे आगामी कसोटी मालिकेसाठी स्पेशालिस्ट यष्टिरक्षक म्हणून इशानची निवड झाली तरी कुणी आश्चर्य मानू नये. मात्र इशान टी-20 संघात असेल की नाही ते येणारा काळच निश्चित करेल.