भाजपमध्ये कोपरगावात दोन गट पडले; विखे विरुद्ध कोल्हे संघर्ष पेटण्याची शक्यता

भाजपात अंतर्गत घडामोडी या आता मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाल्या आहेत. त्यातच आता कोपरगावमध्ये भाजपातील अंतर्गत संघर्ष उघड होत आहेत. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व भाजपचे विवेक कोल्हे यांच्यामध्ये आता अंतर्गत संघर्ष सुरू झाल्यामुळे आता भाजपचे दोन गट एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकल्याचे दिसून येत आहे. नगर जिल्ह्याला व राज्याला काळे व कोल्हे हा संघर्ष नवा नाही. माजी खासदार शंकरराव काळे विरुद्ध माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्यामील संघर्ष हा सर्वांनीच पाहिला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याची चर्चा होत असते. या दोघांच्या गटातटाच्या राजकारणामध्ये अनेकांनी उडी घेतली. काळे व कोल्हे यांचे गट आजही आहेत.

भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्यांमध्ये स्नेहलता कोल्हे यांचा समावेश आहे. त्या भाजपच्या माजी आमदार होत्या. त्यांचे पुत्र विवेक कोल्हे राजकारणामध्ये उतरले आहेत. ज्या वेळेला विखेंच्या विरोधातला संघर्ष हा भाजपमध्ये सुरू झाला त्यामध्ये सुरुवात होती ती विखेंनी भाजपचे आमदार पाडले. त्यामुळे स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झाला, अशी चर्चा आहे. विखेंच्या विरोधांमुळे पडलेल्या सर्व आमदारांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती. त्यामुळे विखेंच्या विरोधात आजही अनेकांच्या मनात नाराजी आहे. ती सातत्याने उघड होत असते.

कोल्हे यांनी आता विखेंना शह देण्याची तयारी सुरू केली आहे. नुकत्याच राहता तालुक्यामध्ये म्हणजेच विखे यांच्या मतदारसंघांमध्ये गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कॉलनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची साथ घेत या ठिकाणी निवडणूक लढवली. त्यात विखे गटाचा दारुण पराभव झाला. कोल्हे यांच्याकडे सत्ता आली त्यामुळे अंतर्गत संघर्ष हा तेव्हापासूनच चांगलाच पेटला आहे. आता तर कोल्हे विरोधामध्ये विखे यांनीसुद्धा थेट संघर्ष करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव तालुक्यामध्ये विखे यांनी लक्ष देण्यास सुरुवात करून राधाकृष्ण विखे यांनी स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांचे नाव न घेता टीका केली आहे. तसेच आशुतोष काळे यांना जाहीरपणे पाठिंबा देत विखे काळेंबरोबर राहणार हे जाहीर केले आहे.

नगर जिल्ह्यामध्ये विख्यांच्या विरोधामध्ये भाजपमध्ये या अगोदरच असंतोष हा मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला आहे. त्यातच मागील महिन्यामध्ये नाश्ता या ठिकाणी भाजपाच्या निष्ठावंतांनी मेळावा घेत विखेंच्या विरोधामध्ये जाहीरपणे वक्तव्य केलेले होते आता विखे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये जाहीरपणे संघर्ष घेण्यास सुरुवात केलेली आहे त्याचेच अत्यंत या नगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे आगामी काळामध्ये आता विखे विरोधामध्ये कोल्हे असा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.