जनतेने रूळ उखडून टाकलेत; तुमचं इंजिन दिल्लीत कसं जातं तेच बघतो!

आता चोराच्या हातात शिवधनुष्य आहे. जे रावणाला पेलले नाही ते शिवधनुष्य मिंध्यांना पेलणार आहे का? त्यांना चाळीस गद्दारांच्या दाढीचे वजन पेलवत नाही. आत्ताच उताणे झालेत जागावाटपामध्ये.

भाडोत्री जनता पक्षाच्या ट्रिपल इंजिन सरकारला भ्रष्टाचाराची चाके लागली आहेत. भाडखाऊ जनता पक्ष आहेच, दुसरे मिंधे आहेत, तिसरे 70 हजार कोटींचे अजित पवार आहेत आणि आता ‘आदर्श’ अशोक चव्हाणही आलेत. ही भ्रष्टाचाराची चाके लावून इंजिन पुन्हा दिल्लीत जाईल असे वाटले असेल, पण तुमचे पुढचे रूळ जनतेनेच उखडून टाकले आहेत. आता पुन्हा तुम्ही दिल्लीत कसे जाता तेच बघतो, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले.

उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचा झंझावाती जनसंवाद दौरा केला. आज दुसऱया दिवशी कारंजा आणि वाशीम येथे उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी तुफान गर्दी उसळली होती. जनतेच्या साक्षीनेच उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मिंधे सरकारचा जोरदार समाचार घेतला. महाविकास आघाडी ही तीन पक्षांची आघाडी असून ही तीन चाकी रिक्षा पंक्चर झाली आहे असे वक्तव्य पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले होते. त्यावर पलटवार करताना उद्धव ठाकरे यांनी, तुमच्या ट्रिपल इंजिन सरकारला भ्रष्टाचाराची चाके का लागताहेत, असा टोला शहा यांना लगावला. वाफेचे इंजिन असते तसे या सरकारला भाजपचे थापेचे इंजिन आहे, अशी खिल्लीही त्यांनी उडवली.

शिवसेनेशी गद्दारी करून मिंध्यांना सामील झालेल्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी आणि आमदार संजय राठोड यांच्या भ्रष्टाचाराची पिसे काढतानाच उद्धव ठाकरे यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. मिंध्यांनी शिवसेनेचे नाव चोरले, पक्ष पह्डला, प्रभू रामचंद्रांचा धनुष्यबाणही कलुषित करून टाकला, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शेतकऱयांनो, वाटेत काटे पेरून भाजपला दिल्लीत जाण्यापासून रोखा
आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱया उत्तरेतील शेतकऱयांच्या वाटेत मोदी सरकारने खिळे पेरले. ते दिल्लीत घुसू नयेत म्हणून पुंपणे लावली. याची आठवण यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शेतकऱयांना करून दिली आणि भाजपच्या वाटेत इतके काटे पेरा की ते पुन्हा दिल्लीत गेलेच नाही पाहिजेत, असे जबरदस्त आवाहन केले. मोदींनी कोणताही उमेदवार उभा केला तरी गावातील एकही मत त्याला देणार नाही, शेतकऱयांना चिरडणाऱया हुकूमशाही सरकारला पुन्हा मत देणार नाही, मोदी सरकारला पुन्हा दिल्लीत येऊ देणार नाही, अशी शपथ घेणार का, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारले. त्यावर शेतकऱयांच्या एकमुखी होकाराने परिसर दुमदुमला.

…म्हणून रिकामी खुर्च्यांसमोर भाषण करताहेत कण्हून
उद्धव ठाकरे यांनी यावेळी मिंधे सरकारच्या शासन आपल्या दारी योजनेच्या फसगतीची खिल्लीही उडवली. घटनाबाह्य सरकार या कार्यक्रमासाठी फिरतेय. ‘सरकार आपल्या दारी पण कुणी नाही विचारी’ मिंधे रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण ठोकताहेत, म्हणून असे कण्हून कण्हून म्हणताहेत. अशी मिश्कील टिप्पणीही उद्धव ठाकरे
यांनी केली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी मंत्री संजय देशमुख यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, सुधीर कवर, जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, महंत सुनील महाराज, पवन जैस्वाल आदी उपस्थित होते.

मोदींना स्वतःच्या आमदारांचीही पर्वा नाही
दार्जिलिंगमधील भाजपा आमदार नीरज झिंबा यांनी गोरखा समाजाला दिलेली वचने भाजपने पूर्ण केली नाहीत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्र लिहिले. त्या वचनांचे काय झाले अशी विचारणार केली. भाजपच्या आमदाराला स्वतःच्या रक्ताने पत्र लिहावे लागते, आमदार मरताहेत त्याची मोदींना काहीच चिंता नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

नमस्कार गद्दारभाऊ… भाजपा भ्रष्टाचार अभय योजनेचा लाभ मिळाला का
भाडोत्री जनता पक्ष नवनवीन योजना आणतोय. कदाचित भ्रष्टाचारी अभय योजनाही आणली असेल. तुमच्यापैकी काहींना फोनही आले असतील. नमस्कार, गद्दारभाऊ….किंवा नमस्कार, गद्दारताई…तुम्हाला अभय योजनेचा लाभ मिळालाय का…हो मिळाला. तुम्हाला ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा काही त्रास आहे का….नाही. मग तुम्ही भाजपला मते देणार का, यावर गद्दार म्हणतील मते काय आतापर्यंत भाजपची धुणीभांडीच करतोय. असा खुमासदार किस्सा उद्धव ठाकरे यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

बाळासाहेबांचा फोटो लावून जिंकलो, मोदींचा नव्हे
आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये शिवसेना जिंकली ती हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पह्टो लावून, मोदींचा नव्हे असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठणकावून सांगितले. यवतमाळमध्ये पुंडलिकराव गवळी काय मोदींचा पह्टो लावून जिंकले नव्हते असे सांगतानाच, मोदींचा फोटो लावून जिंकता येणार नाही म्हणून आता मिंधे शिवसेनाप्रमुखांचा फोटो लावून फिरताहेत, असेही टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले.