हिंदुस्थानने सर्व खेळाडूंना विमानतळावरून माघारी बोलावले

चीनने हिंदुस्थानातील वुशू संघातील तीन खेळाडूंना स्टेपल व्हिसा जारी केला. हे तिन्ही खेळाडू अरुणाचल प्रदेशातील रहिवासी आहेत. 11 सदस्यीय हिंदुस्थानी संघ चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये सहभागी होण्यासाठी जात होता, परंतु चीनच्या या भूमिकेचा निषेध नोंदवत केंद्र सरकारने संघातील सर्व खेळाडूंना विमानतळावरून माघारी बोलावले. चीनने हिंदुस्थानातील वुशू टीममधील सहभागी असलेल्या अरुणाचल प्रदेशातील तीन खेळाडूंना साधारण व्हिसा देण्याऐवजी स्टेपल व्हिसा जारी केला. हिंदुस्थान परराष्ट्र मंत्रालयाने याचा निषेध नोंदवला असून हे अस्वीकार्य आहे, असे म्हटले आहे. 11 सदस्यीय हिंदुस्थानी टीम वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी चीनला रवाना होणार होती. परंतु अधिकाऱयांच्या सर्व मंजुरीनंतर या खेळाडूंना चीनमध्ये जाण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. त्यांना विमानतळावरून माघारी बोलावण्यात आले.