Tiger 3 ‘वॉर’ आणि ‘पठान’ नंतर काय झाले? टायगर 3 मध्ये कळणार; शाहरूख, सलमान आणि हृतिक एकत्र दिसणार ?

यशराज फिल्मने सलमान खान आणि कॅटरीना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या टायगर-3 या चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध केले आहे. सिनेरसिकांसाठी आनंदाची बातमी ही आहे की या पोस्टरमध्ये लिहिण्यात आले आहे की ‘वॉर’ आणि ‘पठान’नंतर झालेल्या घटनांनंतर. याचा अर्थ स्पष्ट आहे की वॉरमध्ये प्रमूख भूमिकेत असलेला हृतिक रोशन आणि पठाणमध्ये प्रमुख भूमिकेत असलेला शाहरूख खान हे आगामी काळात सलमान खानसोबत एकाच चित्रपटात दिसण्याची दाट शक्य़ता आहे.

पठान चित्रपटानंतर आदित्य चोप्रा अधिकृतपणे जाहीर केले होते की यशराज फिल्म्सचे गुप्तहेरपट यापुढे विस्तारत जाणार आहे. पठाण चित्रपटामध्येच त्याची पहिली झलक पाहायला मिळाली होती कारण या चित्रपटात सलमान खान हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. यापाठोपाठ आता वॉरमध्ये ‘कबीर’ ची भूमिका साकारणाऱ्या हृतिक रोशनचीही एन्ट्री होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)