IPL 2024 : RCB चा पराभव, चेन्नईच्या ‘या’ माजी खेळाडूचा बंगळुरुला टोला

राजस्थानविरुद्ध बंगळुरु यांच्यामध्ये झालेल्या एलिमिनेटर सामन्यात बंगळुरुचा पराभव झाला आणि त्यांचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले. मात्र या सामन्यानंतर चेन्नईचा माजी खेळाडू अंबाजी रायडूने त्यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.

आयपीएल 2024 च्या किताबावर आरसीबी संघ आपलं नाव कोरेल अशी आशा बंगळुरुच्या चाहत्यांना होती. मात्र राजस्थानने त्यांचा चार विकेटने पराभव केला आणि चाहत्यांचा हिरमोड झाला. बंगळुरुच्या पराभवानंतर चेन्नईचा माजी खेळाडू अंबाती रायडूने Star Sports शी बोलताना खरमरीत टीका केली आहे. “आरसीबी या संघाचा विचार केला, तर निदर्शनास येते ते फक्त उत्कटता आणि आक्रमक सेलिब्रेशन. पण त्यामुळे ट्रॉफी जिंकता येत नाही. तुम्ही तसे नियोजन केले पाहिजे. केवळ प्लेऑफमध्ये पोहोचून तुम्हाला आयपीएल ट्रॉफी जिंकता येत नाही,” असे म्हणत रायडूने बंगळुरुच्या आक्रमकतेवर भाष्य केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

“तुम्हाला त्याच आक्रमकतेने खेळले पाहिजे. सीएसकेला हरवून तुम्ही आयपीएल ट्रॉफी जिंकाल असा विचार करु नका, तुम्हाला पुढच्या वर्षी पुन्हा यावे लागेल. आरसीबीच्या फ्रेंचायजीने हिंदुस्थानी खेळाडूंवर अधिक विश्वास दाखवण्याची गरज आहे. मला नाही वाटत की विराट कोहील व्यतिरिक्त इतर कोणत्याही हिंदुस्थानी फलंदाजाला 1000 पेक्षा अधिक धावा करता आल्या,” आरसीबीच्या फ्रेंचायजीने हिंदुस्थानी खेळाडूंना प्राधान्य दिले पाहिजे अस रायडू म्हणाला आहे.