IPL 2024 : यश दयालला शिवीगाळ, बाटली फेकली? RCB च्या पराभवानंतर विराट कोहलीवर मोठा आरोप

IPL 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थानने बंगळुरुचा 4 विकेटने पराभव करत अंतिम सामन्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. बंगळुरुचा पराभव झाल्यामुळे त्यांचा या हंगामातील प्रवास संपुष्टात आला. मात्र या सामन्याच्या 17 व्या षटकामध्ये विराट कोहलीचे रौद्ररुप चाहत्यांच्या निदर्शनास पडले. कारण त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात यश दयालने हातळालेल्या शेवटच्या षटकामुळे बंगळुरुला विजय मिळवता आला होता. मात्र राजस्थानविरुद्ध एलिमीनेटर सामन्यात यश दयाल सपशेल अपयशी ठरला. त्याने 3 षटक टाकताना 37 धावा दिल्या. तसेच त्याला विकेट घेण्यात सुद्धा अपयश आले. त्यामुळे विराट कोहली त्याच्यावर चांगलाच भडकला होता.

राजस्थानचा संघ फलंदाजी करत असताना डावाचे 17 वे षटक टाकण्याची जबाबदारी यश दयालला देण्यात आली होती. या षटकातील सुरुवातीच्या दोन चेंडूवर दयालने फक्त दोन धावा दिल्या. मात्र त्यानंतर सलग दोन चेंडूंवर शेमरन हेटमायरने त्याल दोन चौकार ठोकले. त्यानंतर तीसरा चेंडू फुलटॉस आणि चौथा चेंडू दयालने उजव्या यष्टीच्या बाहेर फेकला. त्यामुळे यश दयालच्या खराब गोलंदाजीवर विराट कोहली चांगलाच नाराज झाला. सीमारेषेवर उभा असलेल्या विराट कोहलीने रागाच्या भरात एनर्जी ड्रींक पीऊन झाल्यावर बॉटल फेकून दिली. तसेच तो काहीतरी बडबडत असल्याचे कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. समाज माध्यमांवर चर्चा आहे की विराट यश दयालच्या गोलंदाजीवर नाराज असल्यामुळे भडकला होता. तसेच विराटवर शिवीगाळ केल्याचा सुद्धा आरोप केला जात आहे.