अखेर अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम; ट्विटरच्या माध्यमातून केली अधिकृत घोषणा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते अशोक चव्हाण यांनी अखेर काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सागंण्यात येत आहे. चर्चाही केल्याची चर्चा आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं ते नार्वेकरांना भेटले होते. त्यावेळीच ते काँग्रेसमधून बाहेर पडणार स्पष्ट होऊ लागलं होतं. आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असं जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे.

आगामी राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असं बोललं जात आहे. भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 15 फेब्रुवारीला संभाजीनगर दौऱ्यावर येणार असून त्यावेळी अशोक चव्हाण पक्ष प्रवेश करण्याची शक्यता आहे.