मी निवडून आलो नाही तर….; डोनाल्ड ट्रम्प यांचा जो बायडेन यांना इशारा

अमेरिकेत या वर्षात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे अमेरिकेतील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जो बायडेन यांच्यावर हल्ला चढवत आहे. ओहायोतील डेटन शहरात झालेल्या एका सभेत ट्रम्प यांनी बायडेन यांना अपशब्द वापरत आक्षेपार्ह वक्त्य केलेच, तसेच मी निवडून आलो नाही तर देशात हिंसाचार उफाळेल, असा इशाराही दिला.

या सभेत बायडेन यांच्याबाबत ट्रम्प यांनी You are dumb son of…असे वक्तव्य केले. त्यावर ट्रम्प यांच्या समर्थकांनी नारेबाजी करत त्यांचा उत्साह वाढवला. त्यानंतर या निवडणुकीत आपण निवडून आलो नाही तर देशात हिंसाचार उफाळेल, असा इशारा दिला. मात्र, या इशारा त्यांना नेमका कशासंदर्भात दिला, ते स्पष्ट झालेले नाही. बायडेन यांच्यासोबत ट्रम्प यांनी चीनलाही इशारा दिला. आपण राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर चीन त्यांची इंपोर्टेड कार अमेरिकेत विकू शकणार नाही. त्यामुळे बायडेन आणि चीन यांना इशारा देत ट्रम्प मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प अशा प्रकारची वक्तव्ये करत देशाची प्रतिमा मलीन करत असल्याचे बायडेन यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. तसेच त्यांनी 2020 मध्ये निवडणूक निकालात फेरफार करण्याचा प्रयत्नही केला होता. 6 जानेवारी 2021 मध्ये ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल हिल्सवर हल्ला केला होता. आता पुन्हा आपण निवडून आलो नाही, तर हिंसाचार उफाळेल असा इशारा ट्रम्प यांनीच दिला आहे. आता येणाऱ्या काळात निवडणुकांमध्ये अमेरिकेतील राजकीय वातावरण तापणार आहे.