15 रुपयांचा कांदा दुबईत 120 रुपयांना विक्री

यूएईला कांद्याची निर्यात होत असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी आणि व्यापारी संतप्त झाले आहेत. निर्यातबंदीमुळे शेतकऱयांना 12 ते 15 रुपये किलोने कांदा विकावा लागला. परंतु, हाच कांदा यूएईच्या स्टोअरमध्ये निर्यात केल्यानंतर 120 रुपये किलोने विकला जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱयांनी केला आहे. कांद्याच्या निर्यातीवर दीर्घकाळ बंदी असताना, संयुक्त अरब अमिराती (यूएई) सारख्या बाजारपेठेत सरकारने परवानगी दिलेली काही शिपमेंट कवडीमोल भावात विकली गेल्याने शेतकरी आणि व्यापारी नाराज आहेत.