IPL 2024 : कर्णधार हिंदुस्थानी हवा! RCB च्या पराभवानंतर विरेंद्र सेहवागचे परखड मत

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात चौकार आणि षटकारांची तुफान आतिषबाजी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील 287 ही सर्वोच्च धावसंख्या उभी केली. प्रत्युत्तरात लक्षाचा पाठलाग करताना बंगळुरूने 268 धावांपर्यंत मजल मारली. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. आरसीबीच्या पराभवानंतर हिंदुस्थानचा विस्फोटक माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने आपले परखड मत व्यक्त केले आहे.

आरसीबीने आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. सात सामन्यांपैकी फक्त एका सामन्यामध्ये त्यांना विजय मिळवता आला आहे. आरसीबीच्या खराब कामगिरीवर विरेंद्र सेहवागने आपले मत मांडले आहे. “तुमच्याकडे 12 ते 15 हिंदुस्थानी खेळाडू, 10 परदेशी खेळाडू आणि तुमच्या संपूर्ण स्टाफमध्ये परदेशी खेळाडू असतील तर ही मोठी समस्या आहे. कारण त्यातले मोजकेच आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. बाकीचे खेळाडू हिंदुस्थानी असून काहींना इंग्रजी कळत नाही. त्यामुळे तुम्ही त्यांचे प्रोत्सोहान कसे वाढवाल? त्यांच्यासोबत संवाद कसा साधला जातो? त्यांच्यासोबत वेळ कोण घालवतं? मला एकही हिंदुस्थानी कर्मचारी दिसत नाही,” असे म्हणत सेहवागने आरसीबीच्या सपोर्ट स्टाफवर प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहे.

T20 World Cup 2024 : हार्दिक पंड्याचा पत्ता होणार कट? निवड समिती घेणार मोठा निर्णय!

“खेळाडूंवर विश्वास ठेवणारी व्यक्ती सपोर्ट स्टाफमध्ये असायली पाहिजे. खेळाडूंना मोकळ्या वातावरणाची गरज आहे जी त्यांना सध्या मिळत नाही. कर्णधार फॅफ डू प्लेसिसमोर खेळाडूंना काहीही बोलता येत नाही. जर कर्णधार हिंदुस्थानी असेल तर मनात काय चालले आहे, हे खेळाडू शेअर करू शकतात. आरसीबीला किमान 2 ते 3 हिंदुस्थानी सपोर्ट स्टाफची गरज आहे,” अशी सूचना विरेंद्र सेहवागने केली.

‘नंबर वन’च्या स्थानासाठी रस्सीखेच; राजस्थान-कोलकाता आज ईडन गार्डन्सवर भिडणार