IPL 2024 – हार्दिकने रोहितला मैदानभर पळवले, थेट सीमारेषेवर तैनात केले; फॅन्स भडकले

इंडियन प्रीमियर लीगच्या 17व्या हंगामातील पाचवा सामना पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स आणि एक वेळच्या विजेत्या गुजरात टायटन्स संघात अहमबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर रंगला. मुंबईचे नेतृत्व हार्दिक पंड्या, तर गुजरातचे शुभमन गिलने केले. या लढतीत गुजरातने मुंबईचा 6 धावांनी पराभव केला. गुजरातने विजयासाठी दिलेल्या 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 162 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

सालाबादप्रमाणे यंदाही मुंबई इंडियन्सने पहिला सामना देवाला दिला. 2013 पासून आयपीएलमध्ये मुंबई सलामीचा सामना गमावात आली आहे. यंदा कर्णधार बदलल्यानंतरही मुंबईने ही परंपरा कायम राखली. या लढतीतल एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यामुळे कर्णधार हार्दिक पंड्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.

नरेंद्र मोदी मैदानावर सामना सुरू असताना शेवटच्या षटकामध्ये मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या क्षेत्ररक्षण लावत होता. यावेळी त्याने रोहित शर्माला थेट सीमारेषेवर तैनात केले. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून हार्दिकने ज्या पद्धतीने रोहितला पळवले ते पाहून चाहते संतापले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

रोहित शर्मा हा टीम इंडियाचा कर्णधार आहे. कसोटी, वन डे आणि टी-20 या तिन्ही प्रकारात टीम इंडियाचे नेतृत्व रोहितकडे आहे. तसेच मुंबई इंडियन्सला त्याने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे. मात्र यंदा संघ व्यवस्थापनाने त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतले आणि गुजरात टायटन्सकडून आयात केलेल्या हार्दिक पंड्याकडे सोपवले. तेव्हाही चाहत्यांनी मुंबई इंडियन्स आणि हार्दिकला ट्रोल केले होते.

आता आयपीएल सुरू झाल्यानंतरही हार्दिकला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. रोहित शर्मा याला अनेकदा स्लीपमध्ये किंवा 30 यार्डच्या आत कव्हरला क्षेत्ररक्षण करताना पाहिले आहे. मात्र यावेळी हार्दिकने त्याला थेट सीमारेषेवर तैनात केल्याने चाहते भडकले.

धावफलक -.

गुजरात टायटन्स – 6 बाद 168 धावा
मुंबई इंडियन्स – 9 बाद 162 धावा
सामनावीर – साई सुदर्शन (45 धावा)