Lok Sabha Election 2024 – उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश, मिळालं लोकसभेचं तिकीट

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली पाचवी यादी जाहीर केली. पाचव्या यादीमध्ये भाजपने पश्चिम बंगालमधील 19 जागांवरील उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांच्याही नावाचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता भाजपने त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले असून तमलुक मतदारसंघातून तिकीट दिले आहे.

Abhijit Gangopadhyay हे कलकत्ता उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश पदावर कार्यरत होते. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली असून तमलुक मतदारसंघातून तिकीट दिले आहे. हा मतदारसंघ तृणमूल काँग्रेसचा गड मानला जातो. 2009 पासून प्रत्येक निवडणुकीमध्ये येथे तृणमूलचा उमेदवार विजयी होत आला आहे.

Lok Sabha Election 2024 – काँग्रेसची पाचवी यादी जाहीर, चंद्रपूरच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब

कोण आहेत अभिजीत गंगोपाध्याय?

अभिजीत गंगोपाध्याय यांचा जन्म 1962 मध्ये कोलकातामध्ये झाला. येथील हाजरा लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. सुरुवातीला त्यांनी उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात सिव्हील सर्व्हिस ग्रेड ए अधिकारी म्हणून काम केले. त्यानतर कलकत्ता उच्च न्यायालयामध्ये वकिलीही केली. पुढे त्यांनी अधिक प्रगती केली आणि 2018मध्ये अतिरिक्त न्यायाधीश पदापर्यंत गेले. दोन वर्षानंतर अभिजीत गंगोपाध्याय त्या पदावर कायम झाले आणि न्यायाधीश म्हणून ते कार्यरत झाले.