Lok Sabha Election 2024 : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तिकीट का दिले? राजकीय पक्षांना द्यावी लागेल माहिती

सध्या देशभरातील पक्ष लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपांमध्ये गुंतलेले आहेत. कोणला तिकीट द्यायचे कुणाचे तिकीट कापायचे यावर सध्या विचारमंथन सुरू आहेत. दरम्यान शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी तारखांची घोषणा करतानाच राजकीय पक्षांना काही सूचना देखील केल्या आहेत. या सूचनांनुसार राजकीय पक्षांनी जर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला जर तिकीट दिले तर ते क दिले याचे पक्षांना स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. राजकीय पक्षांना वृत्तपत्रांना तीन वेळा जाहीराती देऊन अशा लोकांना तिकीट का दिले याची माहिती मतदारांना द्यावी लागणार आहे.

लोकसभा निवडणूकीचे पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिलला होणार असून शेवटच्या म्हणजे सातव्या टप्प्यात 1 जूनला मतदान होणार आहे. तर देशभरात 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. 4 जूनला मतमोजणी लोकसभा निवडणुकीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही होणार आहेत.

लोकसभा निव़डणूकीसाठी देशभरात 10.5 लाख पोलिंग बुथ उभारले जाणार आहेत. सध्या देशात 97 कोटी नोंदणीकृत मतदार आहेत. त्यात 49.7 कोटी पुरुष तर 47.1 कोटी महिला आहेत. यंदा 1.82 कोटी नवीन मतदार यंदा मतदान करणार आहेत. तर 100 पेक्षा जास्त वयाचे दोन लाख मतदार आहेत.