नॅनोचा सिंगूर प्रकल्प रद्द; बंगाल सरकारला टाटा मोटर्सला 766 कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागणार

टाटा मोटर्सचा सिंगूरमधील नॅनो कार प्रकल्प बंद पडल्यानंतर टाटा मोटर्सने तेथे केलेल्या गुंतवणुकीची भरपाई आणि त्यांचे झालेले नुकसान यासाठी पश्चिम बंगाल सरकारला टोटा मोटर्सना 765.78 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश लवादाने दिले आहेत. टाटा मोटर्सने याबाबत सोमवारी माहिती दिली. आता बंद पडलेल्या सिंगूर प्रकल्पामधील गुंतवणुकीची भरपाई म्हणून पश्चिम बंगाल सरकारने 765.78 कोटी रुपये देण्याचे आदेश लवादाने दिले आहेत. तीन सदस्यीय लवादाच्या न्यायाधिकरणासमोर या प्रलंबित लवादाची कार्यवाही पूर्ण झाली असून ही याचिका टाटा मोटर्स लिमिटेडच्या बाजूने एकमताने निकाली काढण्यात आली आहे.

या निकालामुळे टाटा मोटर्सना नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी पश्चिम बंगाल सरकारकडून 765.78 कोटींची रक्कम मिळणार आहे. तसेच 1 सप्टेंबर 2016 पासून 11 टक्के व्याजराने ही रक्कम द्यावी लागणार आहे, असे टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे. तसेच या दाव्यासाठीच्या खर्चापोची 1 कोटींची रक्कमही टाटा मोचर्सना मिळणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तत्कालीन विरोधी पक्षनेत्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने जबरदस्तीने शेतजमीन ताब्यात घेतल्याचा आरोप झाल्यानंतर टाटा मोटर्सने 2008 मध्ये ‘नॅनो’ कारसाठी घतलेल्या सिंगूर प्लांटमधून बाहेर पडण्याची घोषणा केली होती.

टाटा मोटर्सने पश्चिम बंगालमधील सिंगूर येथून गुजरातमधील साणंद येथे नॅनो कारचा आपला प्लांट नेला आहे. टाटांनी तोपर्यंत सिंगूरमध्ये 1,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम गुंतवली होती. यामुळे नॅनोच्या मूळ योजनांना केवळ पाच महिन्यांचा विलंब झाला नाही तसेच त्याच्या उपलब्धतेवरही परिणाम झाला. सिंगूर येथील ऑटोमोबाईल उत्पादन सुविधेशी संबंधित भांडवली गुंतवणुकीच्या नुकसानीसह विविध खर्चासाठी पश्चिम बंगालच्या (WBIDC) कडून नुकसान भरपाईच्या ऑटो मेजरच्या दाव्यासंदर्भात ही भरपाई देण्यात येत आहे. अंतिम न्यायाधिकरणाच्या निवाड्यासह, लवादाची कार्यवाही संपुष्टात आली आहे, असे कंपनीने म्हटले आहे.