धनुष – ऐश्वर्या होणार विभक्त

साऊथ सुपरस्टार धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या यांनी 18 वर्षाच्या संसारानंतर आता विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच त्यांनी चेन्नईच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. धनुष आणि सुपरस्टार रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या यांनी 17 जानेवारी 2022 रोजी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली होती. घोषणेनंतर देखील ते दोघे आपल्या मुलांच्या शाळेच्या कार्यक्रमात अनेकदा एकत्र दिसले. घोषणेनंतर दोन वर्षांनी त्यांनी आता घटस्फोटासाठी रितसर अर्ज दाखल केला आहे. 2004 साली धनुष आणि ऐश्वर्याचे लग्न झाले होते.