शिर्डीत रामनवमीचा उत्साह; साईबाबा मंदिरात पाद्यपूजेसाठी भाविकांची गर्दी

श्री रामनवमीनिमित्त शिर्डीत उत्साह पाहायला मिळत आहे. श्री रामनवमी उत्‍सवा निमित्‍त मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मं‍डपाच्‍या स्‍टेजवर सकाळी 10.00 ते 12.00 यावेळेत ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचा श्रीराम जन्‍मोत्‍सव कीर्तन कार्यक्रम झाला.

श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर श्रींचे फोटो, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. या उत्सवानिमित्त साई बाबा मंदिरात संस्‍थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्‍यांची सुविद्य पत्नी मालती यार्लगड्डा यांनी श्रींची पाद्यपूजा केली. तसेच भाविकांनीही पाद्यपूजेसाठी गर्दी केली होती. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी शिर्डी ग्रामस्‍थ व साईभक्‍त यांच्‍या उपस्थितीत श्रीराम जन्‍मोत्‍सव साजरा करण्‍यात आला.