Loksabha Election 2024 आम्ही हुकूमशाही गाडणारच, शिवसेनेने निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर केल्या. महाराष्ट्रात 19 ते 20 मे दरम्यान पाच टप्प्यांत मतदान होणार असून 4 जून रोजी या निवडणूकीचा निकाल लागणार आहे. तारखा जाहीर केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. त्यात शिवसेनेने ‘आम्ही हुकूमशाही गाडणारच’ असे पोस्ट करत लोकसभा निवडणूकीसाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे.