डॉक्टर बनून हॉस्पीटलमध्ये शिरण्याचा प्रयत्न; टीकटॉक स्टारला अटक

अनेकदा बोगस डॉक्टरांची प्रकरणे उघडकीस येत असून त्यामुळे आजारी व्यक्तींच्या जिवाशी खेळ होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, आता प्रसिद्धीसाठी थेट रुग्णालयात शिरत एका टिकटॉक स्टारने डॉक्टर असल्याचा बनाव केला. तसेच यातून अनेक लाइक्स मिळवले तसेच अनेकांना सल्ले देत बनावट औषधांची विक्री केल्याचेही उघडकीस आले आहे. तसेच सुमारे 3 लाख फॉलोअर्स असल्याचे आढळून आले आहे. डॉक्टर असल्याचा बनाव करणारा टिकटॉक स्टार मॅथ्यू लानीला अटक करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे डॉक्टर असल्याचा बनाव करणाऱ्या मॅथ्यू लानीने शालेय शिक्षणही पूर्ण केलेले नाही.

प्रसिद्ध टिकटॉकर मॅथ्यू लानी (वय 27) याच्यावर डॉक्टर असल्याच्या बनाव केल्याचा आणि सोशल मिडायद्वारे वैद्यकीय सल्ला दिल्याचे तसेच हॉस्पिटलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याचे आरेप ठेवण्यात आले आहेत. सोशल मीडियावर वैद्यकीय कौशल्याच्या नावाखाली त्याने सुमारे 300,000 फॉलोअर्स मिळवल्याचे उघडकीस आले आहे. गळ्यात स्टेथोस्कोप अडकवून डॉक्टराच्या वेशात लानीला रुग्णालयात अचक करण्यात आली. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सर्जिकल मास्क आणि स्टेथोस्कोप घालून डॉक्टरांच्या वेषभूषेत गेल्या आठवड्यात जोहान्सबर्ग रुग्णालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गौतेंग आरोग्य विभागाने रविवारी एका निवेदनाद्वारे या वृत्ताची पुष्टी केली आहे. टिकटॉक स्टार लानीला रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. आपण एक कुशल डॉक्टर असल्याचे भासवून अनेकांची त्यान दिशाभूल केली आहे. हेलन जोसेफ हॉस्पिटलमध्ये बाथरुमच्या खिडकीतून उडी मारून लानीला पकडल्यानंतर सुरक्षा रक्षकांना चकवून पळून जाण्याचाही त्याने प्रयत्न केला. मात्र, त्याला पुन्हा पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

एक सुरक्षा रक्षक लानीकडे असलेला स्टेथस्कोप त्याचा नाही, असे ठासून सांगतो आणि या नाट्यमय घटनाक्रमाला सुरुवात होते. या घटनेवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका नेटकरीने म्हटले आहे की, ही फक्त एका गोष्टीची सुरुवात आहे. पुढील कथानक यानंतर उलगडणार आहे. दुसऱ्याने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, प्रसिद्धीसाठी टिकटॉकरने कदाचित हेदेखील केले असेल. तसेच आपण याच दिवसाची वाट पाहत होतो, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. एकाने उपरोधिक प्रतिक्रिया देताना म्हटले की, स्वभावाने गरीब असलेल्या डॉ. मॅथ्यूज लानी रात्रीची शिफ्ट करत असताना त्यांना अटक करण्यात आली.

लानीचे टिकटॉकवर 300,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहते. तसेच त्याने आणखीही एक अकाऊंट सुरू केले होते. त्यात त्याचे 57,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. याबाबतची माहिती मिळाल्यानंर प्रशासन आणि पोलिसांनी आठवडाभर शोध घेत त्याला अटक करण्यात आली. त्याने जोहान्सबर्गमधील विटवॉटरस्रँड विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतल्याचा दावा केला होता. मात्र, त्याचे शालेय शिक्षणही पूर्ण झाले नसल्याची माहिती मिळाली आहे. लानीने आपले नाव डॉ. सनेले झिंगेलवा असल्याचे सांगत अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच डॉ. झिंगेलवा यांनी लानीविरुद्ध फसवणुकीचा आरोप करून फौजदारी खटला दाखल केला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेत गेल्या तीन वर्षांत 124 तोतया डॉक्टरांना अटक करण्यात आली आहेत. एका ऑस्ट्रेलियन टिकटॉकरने हजारो लोकांना आरोग्य आणि लैंगिक सल्ले देत त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. तसेच आता मॅथ्यू लाली या टिकटॉकरने प्रसिद्धीसाठी डॉक्टर असल्याचे भासवत थेट रुग्णालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. आता त्याला अटक करण्यात आली आहे.