नालेसफाई करताना नियमांचे उल्लंघन; महापालिका पंत्राटदाराला साडेचार लाखांचा दंड

 

 

 भांडुपमध्ये नालेसफाईतील गाळ वाहून नेताना नियमांचे पालन न करणे पंत्राटदाराला महागात पडले आहे.गाळ वाहून नेणाऱया वाहनांवर पालिकेचा फलक नसणे, गाळ वाहनात भरल्यानंतर वाहन बंदिस्त न करणे, प्रत्यक्ष काम सुरू करण्याआधी, असताना आणि काम झाल्यानंतर चित्रीकरण न करणे यासाठी पंत्राटदाराला मुंबई महापालिकेने 4 लाख 32 हजारांचा दंड केला आहे. यापैकी 3 लाख 13 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असून उर्वरित 1 लाख 19 हजार रुपयांचा दंड बिलातून वसूल करण्यात येणार आहे.

पावसाळय़ापूर्वी नालेसफाईचे काम पूर्ण करण्यासाठी 6 मार्चपासून नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली. 31 मेपर्यंत 100 टक्के नालेसफाईचे टार्गेट 25 मे रोजी पूर्ण करण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे,

  या वर्षीपासून काम सुरू होण्यापूर्वी, प्रत्यक्ष काम सुरू असताना आणि काम संपल्यानंतर अशा तीनही टप्प्यांमध्ये प्रत्यक्ष दिनांक, वेळ, रिअलटाइम जिओ टॅग यासह चित्रफीत व छायाचित्रे तयार करून ती अपलोड करणे बंधनकारक.

 असे छायाचित्रण व चित्रफीत तयार करताना दररोज नाल्यांमधून गाळ काढल्यानंतर तो ठेवल्याची जागा, नाल्याकाठची दैनंदिन छायाचित्रे, गाळ डंपरमध्ये भरण्यापूर्वी डंपर पूर्ण रिकामा असल्याचे दर्शवणारे चित्रण, डंपरमध्ये गाळ भरताना आणि भरल्यानंतरचे चित्रण, गाळ वाहून नेल्यानंतर डंपिंगवर आलेल्या व जाणाऱया डंपर वाहनांच्या क्रमांकाची तसेच वेळेची नोंद करणे, डंपिंगवर येणाऱया-जाणाऱया वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे ही सर्व जबाबदारी पंत्राटदारांची असते.