स्वत:च डॉक्टर बनायला जाऊ नका; सेल्फ मेडीकेशनच्या प्रयोगांवर डॉक्टरांचा सल्ला

>>राजाराम पवार

एखाद्या आजाराची लक्षणे जाणवू लागली की अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वतःच मेडिकलमधून गोळ्या-औषधे आणून खात आहेत. तर काहीजण गुगल किंवा यू-ट्यूबवरील माहितीचा आधार घेऊन औषधोपचार घेतात. मात्र, एखाद्या आजारावरील औषध प्रत्येक व्यक्तीसाठी लाभदायक ठरेलच असे नाही. काहीवेळा असे सेल्फ प्रयोग आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या गोळ्या-औषधे घेऊ नयेत, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाल्याने सध्या वातावरणात सातत्याने बदल होत आहे. हे वातावरण साथीच्या आजारांसाठी पोषक ठरत असल्याने शहरात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ताप, थंडी, डोकेदुखी खोकला, सर्दी यांसारख्या साथीच्या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत… अशावेळी काहीजण डॉक्टरांचा सल्ला न घेता मेडिकलमधून गोळ्या-औषधे खाऊन आजार बरा करण्याचा प्रयत्न करतात. तर नव्या पिढीतील तरुण हे इंटरनेटवरील माहितीचा आधार घेत स्वतःच औषधे घेत असल्याचा प्रकार वाढत आहे. मात्र, एखाद्या व्यक्तीला अॅलर्जी असेल तर असे सेल्फ प्रकार हे शरीराला इजाही पोहचवू शकतात. . कधीकधी अशा प्रकारांमुळे गंभीर न परिणामांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे कोणत्याही आजाराची लक्षणे जाणवत न असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे औषधोपचार करणे आवश्यक आहे.

सध्या टायफॉइड, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. या सर्व आजारांची लक्षणे एकसारखी येत हे आहेत. त्यामुळे थंडी, ताप, सर्दी, खोकला, असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार ना घ्यावेत. स्वत:च औषधोपचार घेण्याचा प्रयोग करू नये. अन्यथा भविष्यात आजारांचा गुंता वाढण्याचा धोका उद्भवू शकतो, असे हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.

सध्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. थंडी, ताप, डोकेदुखीची लक्षणे जाणवू लागली की, अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकलमधल्या गोळ्या – औषधांवर बरे होण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सेल्फ मेडिकेशन हानिकारक ठरू शकते. त्यामुळे कोणत्याही आजारांवरील औषधे घेण्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

– डॉ. संगीत खेनट, माजी अध्यक्षा, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन.