बँकेची 26 लाखांची केली फसवणूक 

बनावट कागदपत्रे सादर करून एका खासगी बँकेची 26 लाख रुपयाची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बीकेसी परिसरात एक खासगी बँक आहे. त्या बँकेत तक्रारदार हे विभागीय वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. बँकेची एक वेबसाईड आहे. त्या वेबसाईडच्या माध्यमातून अनेक जण पर्सनल लोन साठी अर्ज करतात. कर्जदारांनी दिलेल्या कागदपत्रांची शहनिशा केल्यानंतर त्याना कर्ज दिले होते. काही दिवसापूर्वी बँकेच्या वेबसाईडवर काही जणांनी कर्जासाठी अर्ज केले होते. त्या अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची शहनिशा केली.

ज्यांनी कर्ज घेतले होते, बनावट कागदपत्रे बँकेत सादर केली होती. त्याचा घरचा पत्ता आणि पह्टो वेगळा होता. तसेच त्याचे पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक नव्हते. बनावट कागदपत्रे सादर करून बँकेची 26 लाख रुपयाची फसवणूक झाली. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच बँकेच्या वतीने बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी सहा जणा विरोधात गुन्हा नोंद केला.