Lok Sabha Election 2024 : होऊन जाऊ द्या ‘वन टू वन’ चर्चा, आदित्य ठाकरेंचे मिंध्यांना थेट आव्हान

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची पीआर टीम इन्फ्ल्युएन्सर आणि पॉडकास्ट यांना त्यांचे कार्यक्रम होस्ट करण्याची गळ घालत आहेत. मात्र माझे मिंध्यांना आव्हान आहे की त्यांनी माझ्यासोबत ‘वन टू वन’ पॉडकास्ट करावा, असे थेट आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी एक्स (ट्विटरर) अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे.

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची पीआर टीम इन्ल्फ्लुएन्सर आणि पॉडकास्टना त्यांचे कार्यक्रम होस्ट करण्यास सांगत आहे. मात्र मी मिध्यांना थेट आव्हान देत आहे. त्यांना माझ्यासोबत पॉडकास्ट करावा आणि वन टू वन चर्चा करावी. मिध्यांनी पदभार स्वीकारल्यापासून महाराष्ट्रातून गुजरातला पाठवलेल्या उद्योगांबद्दल चर्चा करूया. महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या संधीला मुकावे लागले. स्वत:च्या स्वार्थासाठी आमच्या पाठीत खुपसण्यात आला. याबद्दल चर्चा करूया.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या का वाढत आहेत? शहरात गुन्हेगारी का वाढत आहे? महिलांना कठीण प्रसंगांना तोंड का द्यावे लागत आहे? महाराष्ट्र भरडला, लुटला जात असताना हे कशाप्रकारे आपल्या पदाचा गैरवापर करून ठेकेदार मित्रांना कंत्राटाचा मलिदा वाटत सुटले आहेत. साधे प्रश्न आहेत, असे थेट आव्हान देत आदित्य ठाकरे यांनी सीएमओलाही टॅग केले आहे.