अन्यायाचा अंधकार मिटवायचा असेल तर ईव्हीएम मशीनवरील मशाल पेटवा; कर्जत-उरणमध्ये आदित्य ठाकरेंची दणदणीत सभा

भाजपने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. 2022 मध्ये गद्दारांना घेऊन आपले सरकार पाडले. त्यानंतर 2023 मध्ये राष्ट्रवादी पह्डली. पवार कुटुंबही पह्डलं. संपूर्ण देशात भाजपचे गलिच्छ राजकारण सुरू असून या नीच राजकारणाविरोधात महाविकास आघाडी लढत आहे. अन्यायाचा हा अंधकार मिटवायचा असेल तर ईव्हीएम मशीनवरील मशाल पेटवावीच लागेल, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मावळ लोकसभेतील मतदारांना केले.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या प्रचारासाठी आज आदित्य ठाकरे यांची खारघरमध्ये भव्य रॅली व कर्जतच्या लोकमान्य टिळक चौकात आणि उरणमधील नानासाहेब धर्माधिकारी प्रांगणात जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी भाजप व मिंधे गटावर जोरदार टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, भाजप 400 पारच्या बाता मारत असले तरी संपूर्ण देशात परिवर्तनाची लाट आहे. त्यामुळे ते 200 जागा पार करतील की नाही अशी अवस्था असून 4 जूनला इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक राज्यात जी अस्थिरता निर्माण झाली आहे, राजकीय गडबड सुरू आहे हे चित्र बदलायचे असेल तर मशाल पेटवून थापाडय़ांना धडा शिकवा, असे आवाहनदेखील आदित्य ठाकरे यांनी केले.

यावेळी मावळ मतदारसंघातील उमेदवार संजोग वाघेरे-पाटील, शिवसेना नेते भास्कर जाधव, आमदार जितेंद्र आव्हाड, मुंबईच्या माजी किशोरी पेडणेकर, शिवसेना उपनेते सचिन अहिर, संपर्कप्रमुख बबन पाटील, जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, महिला जिल्हा संघटक सुवर्णा जोशी, शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, काँग्रेस पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सुदाम गोकुळ पाटील, शिवसेना पनवेल विधानसभा संपर्कप्रमुख वैभव सावंत, महिला जिल्हा संघटक कल्पना पाटील, तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीरंग बरगे, संजय गवळी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे, शेकापचे नारायण डामसे, नीलेश घरत, संजय मोहिते, प्रशांत दिघे, विनोद पांडे, श्रीराम राणे उपस्थित होते.

गद्दार गँगचा ‘एक रेवण्णा’ मुंबईतून उभा आहे

महाराष्ट्रद्वेष्टय़ा भाजपचा बुरखा फाडताना आदित्य ठाकरे म्हणाले, मागच्या महिन्यात टेस्ला उद्योग आपल्याकडे येत होता. त्यावेळी मी म्हणालो, हा उद्योग महाराष्ट्रात आणणार की गुजरातला पाठवणार, यावर भाजपचे मुंबईतील उमेदवार पीयूष गोयल यांनी तुम्ही देश म्हणून बघा. तुम्हाला वेगळी वागणूक देता येणार नाही. कदाचित गुजरातला जाईल पिंवा इतर कुठेही जाईल, असे त्यांनी सांगितले. पण स्वतःसाठी ओरबाडण्याकरिता दिल्लीत जाणारे घटनाबाह्य मुख्यमंत्री यावर काहीही बोलले नाहीत. भाजपला कायमस्वरूपी नोकर भरती बंद करून कॉण्ट्रक्ट सिस्टीम राबवायचे आहे. त्यासाठी त्यांना कामगार कायद्यात बदल करायचा आहे, असा आरोपदेखील आदित्य ठाकरे यांनी केला.

 

फडणवीसांबरोबर बैठक झाली आणि वेदांतफॉक्सकॉन गुजरातला गेला

वेदांत-फॉक्सकॉनमुळे राज्यातील एक लाख तरुणांना रोजगार मिळणार होता, मात्र गद्दारांनी आपले सरकार पाडून खोकेवाल्यांचे सरकार येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांतच्या व्यवस्थापकांसोबत बैठक घेतली. त्यानंतर तिसऱयाच दिवशी या पंपनीने गुजरातमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मी गुजरातच्या विरोधात नाही, पण महाराष्ट्रातील नोकऱया गुजरातच्या घशात घालता तेथे मी भाजपला नडणार म्हणजे नडणार… लढणार म्हणजे लढणार, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या पळवापळवी कारभारावर टीकेचे आसूड ओढले.