आळंदी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

आळंदी नगरपरिषद, भाईचारा फाउंडेशन, महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल, महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल,आळंदी टपरी पथारी,हातगाडी पंचायत अशा विविध सेवाभावी संस्था, रिपब्लिकन सेनेचे वतीने विविध ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.

आळंदी नगरपरिषद, भाजी मंडई ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून साहित्य क्रांती ज्योत नियोजित लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक जागेत अभिवादन सभेस आली.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित स्मारकाच्या जागी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवान वैराट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांच्या हस्ते लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे या मागणीसाठी यावर्षी साहित्य क्रांती ज्योत वाटेगाव येथून पुणेमार्गे आळंदीत आणण्यात आली. या मार्गावर जनजागृती देखील करण्यात आली. या प्रसंगी पथारी संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब शिंदे, लहुराज गायकवाड, सुनील भिसे, संजय भंडे, जिल्हा सरचिटणीस गोरक्षनाथ पवळे, सुरेश आहेरकर, पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य पथारी सुरक्षा दल संतोष सोनवणे अध्यक्ष संतोष सोनवणे, महिला विंग संयोजिका नीलम सोनवणे, आबा शिंदे, गणेश काळे, युवा उद्योजक राहुल चव्हाण,दक्षता सेवा फाउंडेशन अध्यक्ष किरण नरके, उद्धव कांबळे, भागवत काटकर, अविनाश पाटोळे, अमर कांबळे, आदेश सोनवणे यांचेसह विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, नागरिक, समाज बांधव उपस्थित होते.

आळंदी नगरपरीषद कार्यालयात समाजरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शासकीय सूचना मार्गदर्शना प्रमाणे साजरी करण्यात आली. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमेस मुख्याधिकारी कैलास केंद्रे, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी माजी प्राचार्य नानासाहेब साठे, उद्योजक सुरेश झोंबाडे, सूर्यकांत खुडे, कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे, संतोष सोनवणे, नीलम सोनवणे आदी उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आळंदी नगरपरिषदेत उपस्थित मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. या प्रसंगी आळंदी नगरपरिषद, आधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.