हिंदुस्थानात हिंदुंच्या लोकसंख्येत तब्बल 8 टक्के घट; मुसलमान, ख्रिश्चन, शीखांच्या संख्येत मोठी वाढ

हिंदुस्थानमध्ये हिंदू समाजाच्या लोकसंख्येमध्ये मोठी घट झाली असून मुसलमानांची लोकसंख्या मात्र वाढली आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने (EAC-PM) केलेल्या अभ्यासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

1950 ते 2015 या 65 वर्षाच्या कालावधीमध्ये हिंदू समाजाची लोकसंख्या 7.8 टक्के कमी झाली आहे. तर पाकिस्तान आणि बांगलादेश यासारख्या मुस्लिमबहूल देशांच्या तुलनेमध्ये हिंदुस्थानमधील मुसलमान समाजाची लोकसंख्या 43 टक्के वाढली आहे. हिंदुस्थानमध्ये हिंदू समाजासह जैन आणि पारशी समाजाची लोकसंख्या घटली असून मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध आणि शिख समाजाची लोकसंख्या वाढली आहे.

गेल्या 65 वर्षामध्ये एकूण लोकसंख्येतील मुसलमान समाजाचा वाटा 5 टक्क्यांनी वाढला आहे, तर ख्रिश्चनांचा वाटा 3.38 टक्के आणि शीख समाजाचा वाचा 6.38 टक्क्यांनी वाढला आहे. 1950मध्ये देशाच्या लोकसंख्येत हिंदू समाजाचा वाटा 84 टक्के होता. तो 2015 पर्यंत 78 टक्क्यांवर आला. तर दुसरीकडे मुसलमान समाजाचा वाटा 9.84 टक्क्यांवरून 14.09 टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे म्यानमारनंतर बहुसंख्य समाजाची लोकसंख्या कमी होणारा हिंदुस्थाना दुसरा देश ठरला आहे.

म्यानमारमध्ये बहुसंख्या असणाऱ्या बौद्ध समाजाची लोकसंख्या 10 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर नेपाळच्या लोकसंख्येतही हिंदू समाजाचा वाटा 3.6 टक्क्यांनी कमी झाला आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने 167 देशांचा अभ्यास केल्यानंतर मे 2024मध्ये हा अहवाल सरकारकडे सोपवला होता. या अहवालात हिंदुस्थानातील अल्पसंख्यांक सुरक्षित असून त्यांची लोकसंख्याही वेगाने वाढत असल्याचे नमूद करण्यात आले होते.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये मुसलमान समाजाची लोकसंख्या वाढली आहे. पाकिस्तानात फक्त 22 लाख 10 हजदार 566 हिंदू शिल्लक राहिले आहेत. तर येथे जवळपास 18 कोटी 25 लाख 92 हजार मुसलमान आहेत. ख्रिश्चन समाजाचे 18 लाख 73 हजार 348, अहमदी समाजाचे 1 लाख 88 हजार 340, शीख समाजाचे 74 हजार 130, भेस समाजाचे 14 हजार 537 आणि पारसी समाजाचे 3 हजार 917 लोक पाकिस्तानमध्ये राहतात. धक्कादायक म्हणजे पाकिस्तानात जैन समाजाचे फक्त 6 लोकं असल्याचे अहवालातून समोर आले आहे.