नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, प्रहारचा उमेदवार उभा करणार! आमदार बच्चू कडू संतापले

भाजपने अमरावती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने संतापलेल्या आमदार बच्चू कडू यांनी आपण आणि आपला प्रहार पक्ष नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही. आम्ही या जागेसाठी आमचा उमेदवार उभा करणार आहोत, असे बच्चू कडू यांनी आज स्पष्ट केले.

खासदार नवनीत राणा उमेदवारी दिल्यास महायुतीतून बाहेर पडू आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवू, असा इशारा प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी दिला होता. नवनीत राणांना बुधवारी रात्री उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आता बच्चू कडू यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली.

अभिजीत अडसूळ अपक्ष लढणार

नवनीत राणा यांना तिकीट मिळाल्यामुळे मिंधे गटाचे आनंदराव अडसूळ नाराज आहेत. त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहे. मात्र, त्यांना उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे अभिजीत अडसूळ अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहेत. त्यांनी आज निवडणूक
अर्ज घेतला.

भाजपचे कार्यालय पह्डणाऱयाला तिकीट, एवढी लाचारी!

रवी राणा यांनी भाजपचे कार्यालय पह्डले. कार्यालयात घुसून राणा यांनी भाजपचे पोस्टर्स फाडले. आता त्यांचाच झेंडा हातात घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांना राणा यांचा प्रचार करावा लागणार आहे. एवढी लाचारी अन्य कोणत्याही पक्षावर आली नसेल, असा हल्ला कडू यांनी भाजपवर केला.