पोलिसांनी जप्त केले 5 कोब्रा आणि सापाचे विष, BIGG BOSS विजेत्या एल्विश यादवविरोधात गुन्हा दाखल

‘बिग बॉस ओटीटी सीजन 2’ चा विजेता प्रसिध्द युट्यूबर आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत एल्विश यादव याच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. रेव्ह पार्टी केल्याच्या आरोपाखाली एल्विशच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोंदविण्यात आलेल्या एफआयआरनुसार, एल्विशवर विषारी सापांची तस्करी केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या रेव पार्टी मध्ये केवळ सापाचे विष वापरले जात नव्हते तर परदेशी मुलींनाही बोलावण्यात येत होते. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत एल्विश यादव सहित अन्य 6 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

नोएडा सेक्टर 3 चे सहायक पोलिस आयुक्त सौरभ श्रीवास्तव यांनी सांगितले की, वन विभाग आणि भाजपा खासदार मेनका गांधी यांच्या Peoples for animals india या संस्थेने एल्विश यादव आणि एका तस्कराला कोब्रा सापासह पकडले होते. पोलिसांच्या चौकशीदरम्यान, तस्कराने सांगितले की अशा प्रकारचे साप नोएडातील एल्विश यादवसह अनेक युट्यूबर वापरतात. या प्रकारचे साप आणि त्यांचे विष व्हिडीओ शूटींगसाठी आणि रेव पार्ट्यांसाठी वापरले जातात असे त्याने सांगितले.  परदेशी महिलाा देखील हे साप मागवत असल्याचे तस्कराने सांगितले.

पोलिसांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये सापडलेल्या आरोपींकडून 20 मिली विष आणि 9 जिवंत साप ( 5 कोब्रा, 1 अजगर, 2 दुतोंडी साप आणि 1 उंदीर साप ) जप्त केले. या सापांच्या विषाचा वापर पार्टी मध्ये नशेसाठी केला जात होता.  एल्विश यादव आणि अन्य आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे असून आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आणि आयपीसीच्या कलम 120-बी सहित विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.