भाजपने आणखी एका मित्र पक्षाला फसवले; पशुपती पारस यांचा केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा

मित्र पक्षाला फसवणे, दुसऱ्यांचे पक्ष फोडणे ही भाजपची नीती सुरूच आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या जागा वाटपात भाजपने लोक जनशक्ती पार्टीला एकही जागा दिली नाही. त्यामुळे संतापलेल्या पशुपती पारस यांनी भाजपशी युती तोडली आणि पेंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीत भाजपला हा धक्का बसला आहे.

दिवंगत पेंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोक जनशक्ती पार्टीत फूट पडली. भाऊ पशुपती पारस आणि मुलगा चिराग पासवान असे दोन पक्ष झाले. पशुपती पारस यांनी सहा खासदारांसह पक्षाचा ताबा घेतला आणि मोदी सरकारने त्यांना मंत्री पद दिले. मात्र आता लोकसभा जागावाटपात पशुपती पारस यांच्या पक्षाला भाजपने एकही जागा दिली नाही.

बिहारमधील लोकसभेच्या 40 जागांचा एनडीएचा फॉर्म्युला जाहीर झाला. त्यात भाजप 17, जदयू 16, चिराग पासवान यांच्या पक्षाला 5, जितमराम मांझी यांच्या हिंदुस्थानी आवाम मोर्चाला एक आणि उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाला एक जागा देण्यात आली आहे.

‘एनडीए’त अन्याय झाला – पारस
गेली पाच वर्षे एनडीएसोबत आम्ही प्रामाणिकपणे राहिलो. मात्र भाजपने लोक जनशक्ती पार्टीवर अन्याय केला, असा संताप व्यक्त करीत पशुपती पारस यांनी आज पेंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

‘इंडिया’च्या संपर्कात
पशुपती पारस ‘इंडिया’ आघाडीच्या संपका&त आहेत. बिहारमध्ये आघाडी करून हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी शक्यता आहे. राजदच्या नेत्यांशी त्यांची चर्चा सुरू आहे.