Photo- काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये प्रियंकाचा ग्लॅमरस लूक; पाहा फोटो

 

बुल्गारीच्या 140 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने देखील हजेरी लावली आहे. तिच्या ग्लॅमरस लुकचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रियंका नेहमीच तिच्या बोल्ड आणि चार्मिंग लूकसाठी ओळखली जाते. प्रियांका चोप्राने तिच्या या जबरदस्त लुकसाठी फ्लोअर लेन्थ ब्लॅक बॉडीकॉन गाऊन घातला होता. तिच्या पोशाखाला सुरेख एम्ब्रॉयडरी करून चमकदार बनवण्यात आला आहे. विशेष म्हणजे तिच्या गाऊनमध्ये दोन्ही बाजूला पॉकेट्सही देण्यात आले आहेत. प्रियंकाचा आउटफिट ग्लॅमरस बनवण्यासाठी गाऊनला डिप नेकलाइन ठेवण्यात आली आहे. याचबरोबर तिने गळ्यात हिऱ्यांचा नेकलेस आणि हातातही हिऱ्यांचा ब्रेसलेट घातला आहे. त्यावर शोभेसे कानातले आणि न्यूड मेकअप सोबत तिने आपला लूक पूर्ण केला होता. या गाऊनमधील तिच्या लूकने चाहत्यांना भूरळ पाडली आहे.