निमिष, झारा सर्वोत्तम जलतरणपटू

खार जिमखानाच्या वतीने आयोजित खुल्या जलतरण स्पर्धेत खार जिमखान्याच्याच निमिष मुळे आणि झारा बक्षी या दोघांनी सर्वोत्तम जलतरणपटूंचा मान मिळविला.  झारा बक्षी हिने 17 ते 30 वर्षे या वयोगटातील मुलींमध्ये 6 सुवर्णपदके पटकावली तर निमिष मुळे याने 5 सुवर्ण आणि 2 रौप्यपदके पटकावली   तब्बल 15 वर्षांच्या खंडानंतर खार जिमखाना जलतरण समिती आणि  वीरधवल खाडे आणि ऋजुता खाडे यांच्या गोल्ड स्टँडर्ड परफॉर्मन्स या प्रायोजक कंपनीच्या वतीने खार जिमखाना येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  दोन दिवसांच्या या स्पर्धेत मुंबईतील 31 क्लबमधील 500 पेक्षा अधिक स्पर्धकांनी विविध वयोगटात आपला सहभाग नोंदविला होता.   6 वर्षे या वयोगटापासून ते 60 वर्षांवरील अशा विविध वयोगटात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  सर्व वयोगटातील पहिल्या तीन वेजेत्यांना मेडल्स,  ट्रॉफी, प्रमाणपत्रे यांसह रोख पारितोषिके देखील प्रदान करण्यात आली   सर्वोत्तम जलतरणपटू ठरलेल्या दोघांना प्रत्येकी 10 हजारांची रोख रक्कम देण्यात आली.  सदर स्पर्धेत खार जिमखाना संघाने सांघिक विजेतेपद पटकावले.