दिल्लीच्या अध्यादेशावर काँग्रेसचा ‘आप’ला पाठिंबा

बंगळुरु येथे होणाऱया विरोधकांच्या बैठकीच्या एक दिवस आधी काँग्रेसने दिल्लीच्या अध्यादेशावर केंद्राला पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेसचा ‘आप’ला पाठिंबा राहील, असे काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.

विरोधकांच्या बैठकीत आम आदमी पक्षाचाही समावेश असणार असल्याचे वेणुगोपाल यांनी सांगितले. केंद्र सरकारने राजधानी दिल्लीतील प्रशासकीय अधिकाऱयांच्या बदल्या आणि नियुक्त्यांचे अधिकार दिल्ली सरकारकडून काढून घेऊन पुन्हा एकदा नायब राज्यपालांकडे दिले. तसा अध्यादेशही काढला. या अध्यादेशाविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विरोधकांचा पाठिंबा मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 20 जुलैपासून सुरू होणाऱया पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारच्या 21 विधेयकांमध्ये दिल्ली अध्यादेशाचाही समावेश

आहे.