Lok Sabha Election 2024 : पप्पू यादव यांना काँग्रेसचा अल्टीमेटम

अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी खासदार राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांना गुरुवारी बिहारच्या पूर्णिया लोकसभा जागेवरून लढण्यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱयांनी पप्पू यादव यांच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून काँग्रेसचे उत्तर प्रदेशातील प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनी पप्पू यादव यांना नॉमिनेशन मागे घेण्यास सांगितले आहे. काँग्रेसचे नेतृत्व कुणाही काँग्रेस नेत्याला किंवा पदाधिकाऱयाला अपक्ष निवडणूक लढवण्याची परवानगी देत नाही. जर कुणी असे करत असेल तर काँग्रेस पार्टी ते कदापि स्वीकारणार नाही, असा इशारा अखिलेश प्रसाद सिंह यांनी दिला आहे.