Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘1 ऑगस्ट’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Tuesday, August 01, 2023)
नोकरीत नव्या बदलांना सामोरे जावे लागेल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा प्लान कराल. वादविवादापासून दूर राहा. आरोग्याची काळजी घ्या. अडलेली कामे मार्गी लागतील. आवडती कला जोपासाल.
शुभरंग : मोरपिसी

वृषभ (TAURUS – Tuesday, August 01, 2023)
उत्पन्नात वाढ होईल. जोडीदाराकडून खास भेटवस्तू मिळेल. मनात निराशेला प्रवेश देऊ नका. कुटुंबियांकडून शाबासकी मिळेल. घरातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. मनाजोगी घटना घडेल. महादेवाच्या देवळात प्रसाद वाटा.
शुभरंग : मोरपिसी

मिथुन (GEMINI – Tuesday, August 01, 2023)
आराध्य देवतेचे दर्शन घ्या. कार्यालयात वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. घरातील लहान मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. घरातील वाणसामानाची खरेदी कराल. साखरेच्या डब्यात दोन लवंगा ठेवा. अनपेक्षित आलेल्या पाहुण्यांचे यथायोग्य आदरातिथ्य कराल.
शुभरंग : काळा

कर्क (CANCER -Tuesday, August 01, 2023)
दिवसाची सुरुवात उत्साहवर्धक होईल. केलेली मेहनत वाया जाणार नाही. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तिचे मार्गदर्शन घ्याल. आवडत्या सौंदर्य प्रसाधनांची खरेदी कराल. आवडती व्यक्ती आज तुमच्यासाठी वेळ काढेल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. अनावश्यक गप्पा मारण्यात वेळ घालवू नका.
शुभरंग : राखाडी

सिंह (LEO – Tuesday, August 01, 2023)
कुटुंबातील वातावरण आनंददायी असेल. तरुणांना चांगली नोकरी लाभेल. महिलांनी स्वत:चेच म्हणणे खरे करण्याचा अट्टाहास सोडावा. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या. सकाळी सूर्यनमस्कार घाला. मन प्रसन्न राहिल, अशी कामे कराल. घरात सुशोभिकरणाकरिता सात्त्विक वस्तू आणाल.
शुभरंग : पोपटी

कन्या (VIRGO – Tuesday, August 01, 2023)
बऱ्याच दिवसांपासून करत असलेली चिंता मिटेल. लोकं तुमच्याकडे सल्ला मागायला येण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस समाधानात जाईल. सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेकरिता मदत कराल. मारुतीरायाचे दर्शन घ्या.
शुभरंग : राखाडी

तूळ (LIBRA- Tuesday, August 01, 2023)
अनावश्यक पैसे खर्च करू नका. आवडणारे छंद जोपासा. तरुणींकरिता आजचा दिवस आनंददायी आहे. व्यावसायिकांना नव्या योजना व्यवसायात राबवण्याची संधी मिळेल. घरातील फुलदाणीत पिवळ्या रंगाची पाच गुलाबाची फुले ठेवा. जोडीदारासोबत मनोरंजनाचे कार्यक्रम पाहायला जाण्याचा प्लान आखाल.
शुभरंग : राखाडी

वृश्चिक ( SCORPIO – Tuesday, August 01, 2023)
कुटुंबासाठी वेळ काढाल. अनावश्यक पैसे खर्च होणार नाहीत, याची काळजी घ्या. समाजात तुमचे कौतुक होईल. लहान मुलांना सायंकाळी बागेत फिरायला घेऊन जाल. आवडते पुस्तक वाचण्यासाठी वेळ काढाल. चुकीचा निर्णय घेतला जाणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. मनाजोगी खरेदी कराल.
शुभरंग : लाल

धनु (SAGITTARIUS – Tuesday, August 01, 2023)
व्यावसायिक कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळा. मेहतनीला यश मिळेल. लोकं तुमचे म्हणणे ऐकतील. पक्ष्यांना दाणे खाऊ घाला. अन्नदान करा. आनंदाची बातमी कानी येण्याची शक्यता आहे.
शुभरंग : निळा

मकर ( CAPRICORN – Tuesday, August 01, 2023)
भगवान शिवाची उपासना करा. नवीन वाहन खरेदीचे योग आहेत. जोडीदाराला खूश ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. घरातील भावंडं उधार मागण्याची शक्यता आहे. घरी आलेल्या लहान मुलाला खाऊ खायला द्या. मन प्रसन्न राहिल. शिवाला पांढऱ्या रंगाचे फूल वाहा.
शुभरंग : खाकी

कुंभ (AQUARIUS – Tuesday, August 01, 2023)
प्रतिष्ठित व्यक्तिची भेट होईल. व्यवसायाची नवीन संधी लाभेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात मेहनत घ्यावी. महिलांकरिता आजचा दिवस चांगला आहे. कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नका. मनातील नकारात्मक विचार काढून टाका. आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी योग्य व्यक्तिचा सल्ला घ्या.
शुभरंग : मोरपिसी

मीन (PISCES -Tuesday, August 01, 2023)
दूर गेलेल्या कुटुंबियांची भेट होईल. तरुणांनी वाहन चालवताना काळजी घ्यावी. आरोग्य सांभाळा. धार्मिक कार्यानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे. पिंपळाच्या झाडाजवळ साखर ठेवून मनातील इच्छा व्यक्त करा. दररोज आराध्य देवतेचे दर्शन घ्या. सकारात्मक राहाल.
शुभरंग : आकाशी