सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार

राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये यापुढे रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य शासनाने यावर शिक्कामोर्तब केले. या निर्णयामुळे गरीब व गरजू रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये ही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित येतात. ही सर्व रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये मोफत उपचार देण्यात यावेत, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती.

  • राज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाशी संबंधित 2418 रुग्णालये आरोग्य केंद्रे आहेत. तिथे उपचारासाठी वर्षाला सुमारे 2 कोटी 55 लाख रुग्ण उपचार घेतात.
  • नाशिक आणि अमरावती येथील कॅन्सर रुग्णालयांचाही यामध्ये समावेश करण्यात आला असून तिथेही मोफत उपचारांचा लाभ रुग्णांना
    घेता येणार आहे.