कथित खिचडी घोटाळा – चौकशीतून काहीही हाती लागणार नाही; ईडीचे अधिकारीही मान्य करतात, गजानन किर्तीकरांचा दावा

कथित खिचडी घोटाळा प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांची सक्तवसूली संचलनालयाने (ईडी) सोमवारी 7 तास चौकशी केली. मात्र या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही. कथित खिचडी घोटाळ्याच्या चौकशीतून काहीही हाती लागणार नाही, हे ईडीचे अधिकारीही खासगीत मान्य करतात, असा दावा भाजपसोबत सत्तेत असणाऱ्या मिंधे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनी केला आहे. गुरुवारी गोरेगाव येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दिलेल्या 400 पार नाऱ्या वरही किर्तीकर यांनी भाष्य केले. भाजपने यंदा ‘400 पार’ असा नारा दिला आहे. त्याऐवजी त्यांनी संसदच ताब्यात घ्यावी, मात्र दुसऱ्या बाजूला विरोधकांचाही सन्मान ठेवावा, असा टोला गजानन किर्तीकर यांनी भाजपला लगावला. तसेच विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे, ही भाजपाने आणलेली नवी संस्कृती असल्याचे ते म्हणाले