म्हाडाअंतर्गत पुनर्विकास योजनांवर आज मार्गदर्शन शिबीर

दक्षिण मुंबई भाडेकरू कृती समितीच्या वतीने म्हाडामधील तज्ञ अधिकारी, सुप्रसिद्ध वास्तुविशारद व कायदेतज्ञ यांच्या उपस्थितीत दक्षिण मुंबईमधील भाडेकरूंसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर शुक्रवार, 28 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजता दि गोअन इन्स्टिटय़ूट हॉल, ठाकूरद्वार येथे होणार आहे.    

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सहकार्याने हे शिबीर होणार आहे. सदर शिबिरात म्हाडा अंतर्गत सुधारित 79() 91() नियमांनुसार जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत तसेच विकासकाने अर्धवट पुनर्विकास केलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत नवीन सुधारित योजनांची माहिती, पंतप्रधान अनुदान प्रकल्पातील इमारती व पुनर्विकास योजना, डीसीआरमधील 33 (9) अंतर्गत सामूहिक पुनर्विकास योजनेबाबत माहिती तसेच मुंबईतील बिगर उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच उपस्थितांनी विचारलेल्या संबंधित विषयांवरील प्रश्नांना तज्ञ मार्गदर्शकांकडून उत्तरे व स्पष्टीकरण देण्यात येईल. 

दक्षिण मुंबईतील भाडेकरूंनी तसेच म्हाडा इमारतीमधील रहिवाशांनी या शिबिरात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाडेकरू कृती समितीचे निमंत्रक माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, दिनेश पार्सेकर, विजय (बाळा) पारकर, राजू काळे यांनी केले आहे.