भांडुप गावात मनसेला खिंडार

भांडुप गावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार पडले असून शेकडो युवकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवबंधन बांधून पक्षात त्यांचे स्वागत केले.

आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा क्रमांक 111मधील विद्यार्थी शाखा अध्यक्ष दिनेश कोपरकर, शिवराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अक्षय नांगरे पाटील, प्रथम कोपरकर, अजय जाधव, शुभम नाचरे यांच्यासह असंख्य युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार रमेश कोरगावकर, उपनेते दत्ता दळवी, ईशान्य मुंबई लोकसभा उमेदवार संजय पाटील यांची यावेळी उपस्थिती होती.