हस्तमैथुन करून आईस्क्रीममध्ये वीर्य मिसळलं, विकृताचा व्हिडीओ व्हायरल

तेलंगणातील वारंगल जिल्ह्यात एक किळसवाणा प्रकार घडला आहे. इथे रस्त्याच्या कडेला आईस्क्रीम विकणाऱ्या एका व्यक्तीने अत्यंत गलिच्छ प्रकार केला आहे. यामुळे तुम्ही कदाचित आईस्क्रिम खाणंच सोडून द्याल. या व्यक्तीने आईस्क्रिम विकत असताना त्या आईस्क्रिमवर हस्तमैथुन करून त्यात वीर्य मिसळलं आहे. त्याच्या या घृणास्पद कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्या व्यक्तिला अटक केली.

कालूराम कुराबिया असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा राजस्थानचा रहिवासी असून तेलंगणात येऊन तो येथे आईस्क्रीम विकण्याचे काम करायचा. नेकोंडा परिसरातील आंबेडकर सेंटरजवळील वेडिंग झोनमध्ये तो आईस्क्रीम विकायचा. कालूराम आईस्क्रीम विकत असताना त्याच्या आईस्क्रीमच्या गाडीच्या आवरणाखाली हस्तमैथुन करायचा आणि ते वीर्य आईस्क्रिममध्ये मिसळायचा. त्याच्या या कृतीचा पुरावा म्हणून एका व्यक्तिने त्याचा व्हिडिओ काढला आहे.

कालूरामचा हा व्हिडिओ त्या व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला आणि पोलिसांना देखील यासंदर्भात माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी कालूरामवर कारवाई करून त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याची आईस्क्रीमची गाडीही जप्त करण्यात आली आहे. तसचे कालूरामच्या आईस्क्रिमच्या गाडीवरील आईस्क्रीमचे नमुने गोळा केले आहेत. आयपीसी कलम 294 अंतर्गत कालूराम याच्याविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.