न्यायालयात खटले राखून ठेवणे चुकीचे; सरन्यायाधीशांनी व्यक्त केली नाराजी

न्यायाधीश 10 महिन्यांहून अधिक काळ निकाल न देता केस राखून ठेवतात. हा चिंतेचा विषय असून अशी प्रकरणे राखून ठेवणे योग्य नाही, हे चुकीचे आहे, अशा शब्दांत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी न्यायाधीशांच्या या वृत्तीवर नाराजी व्यक्त केली आहे. एवढय़ा कालावधीनंतर खटल्याची पुन्हा सुनावणी झाली, तर मागील सुनावणीदरम्यान केलेल्या तोंडी युक्तिवादाचा काही फरक पडत नाही, असेही सरन्यायाधीश यावेळी म्हणाले.

या प्रकरणाबाबत सर्व उच्च न्यायालयांना सरन्यायाधीशांनी पत्रे लिहिली आहेत. पत्रानंतर मी पाहिले की, अनेक न्यायाधीश केवळ खटले रद्द करतात, त्यांची यादी करतात, नंतर आंशिक सुनावणी करतात. आम्हाला आशा आहे की देशातील बहुतेक उच्च न्यायालयांमध्ये हा कल नाही. सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने उच्च न्यायालयाला या प्रकरणाचा त्वरित निपटारा करण्यास सांगितले आहे.