Lok Sabha Election 2024 : प्रचारादरम्यान महिलेचं चुंबन घेतलं, भाजप उमेदवाराची विकृती

लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार दिवसरात्र प्रचार करत आहेत. मात्र भाजपच्या एका उमेदवाराने प्रचारादरम्यान महिलेच्या गालावर चुंबन घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

बंगालच्या उत्तर मालदा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार खागेन मुर्मु यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. प्रचार करत असताना त्यांची रॅली चंचलमधील श्रीहिपूर गावात गेली होती. यावेळे प्रचारादम्यान त्यांनी एका महिलेच्या गालावर चुंबन घेतले. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. तसेच या घटनेमुळे भाजपचे महिलाविरोधी धोरण सिद्ध झाल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या राज्यात महिला असुरक्षित असल्याची टीका सुद्धा केली जात आहे.

तृणमूल काँग्रेसने आपल्या ट्वीटरवर (X) या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली. “तुम्ही जे पाहिले त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हा भाजपचा खासदार आणि उत्तर मालदाहचा उमेदवार खागेन मुर्मू जो स्वत:च्या मर्जीने प्रचारादरम्यान एका महिलेचे चुंबन घेत आहे. महिला कुस्तीपटूंचा लैगिंक छळ करणाऱ्या खासदारांपासून ते बंगाली महिलांबद्दल अश्लील गाणी करणाऱ्या नेत्यांपर्यंत, अशा महिलाविरोधी राजकारण्यांचा भाजपमध्ये भरणा आहे,” असे म्हणत त्यांनी भाजपच्या महिलाविरोधी धोरणावर टीका केली.

“अशा प्रकारे मोदी का परिवार नारी का सन्मानमध्ये व्यग्र आहे. हे जर सत्तेवर आले तर ते काय करतील याची कल्पना करा,”असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा उपहासात्मक टीका केली आहे.