गुजरातच्या सागरी वारसा म्युझियमला निधी

गुजरातमधील लोथलमध्ये उभारण्यात येणाऱया राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालयात महाराष्ट्राच्या आरमारी इतिहासाचे दालन स्थापन करण्यात येणार आहे. या दालनाच्या निर्मितीसाठी 39 कोटी 60 लाख रुपयांचा निधी देण्यास सरकारने मान्यता दिली आहे.

केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलपरिवहन मंत्रालयाच्या वतीने गुजरातमधील लोथल येथे राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय उभारण्यात येणार आहे. यामध्ये हिंदुस्थानच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सागरी वारसा प्रदर्शित करण्यात येणार आहे. यामध्ये देशातील प्रत्येक राज्याच्या आरमारी वारशाचे स्वतंत्र दालन उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्राला आरमारी वारसा आहे.

या संग्रहालयात महाराष्ट्राच्या आरमाराची माहिती देणारे स्वतंत्र दालन उभारण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या आरमाराची माहिती देणाऱया या स्वतंत्र दालनासाठी राज्याच्या बंदरे विभागाकडून 39 कोटी 60 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

n साडेतीन हजार कोटी रुपये खर्च करून विकसित करण्यात येत असलेल्या या संकुलाच्या उभारणीचे काम मार्च 2022मध्ये सुरू झाले. या संकुलात हडप्पा वास्तुरचनेचे व जीवनशैलीचे दर्शन घडवणारे लोथल मिनी रिक्रीएशन पेंद्र, स्मारक थीम पार्क, हवामानविषयक थीम पार्क, साहसी खेळ तसेच मनोरंजन पार्क अशी चार थीम पार्क होणार आहेत.