महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर! शिवसेना 21, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 10 जागांवर लढणार

मुंबईत नरीमन पाँइट येथील शिवालय येथे महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होत आहे. लोकसभआ निवडणूक जागावाटपाची घोषणा या बैठकीत होत आहे. या बैठकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते बैठकीला उपस्थित आहेत.

गढीपाडव्याला शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीची संयुक्त बैठक होत आहे. या वास्तूत राष्ट्र आणि देशहिताचे निर्णय घेतले जातात. ते महत्त्वाचे असतात. तसेच याथील निर्णय यशस्वी होतात, असा आमचा अनुभव आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. महाविकास आघाडीत गेले काही दिवस सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत या बैठकीत महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात येत आहे. महाविकास आघडीचे जागावाटप जाहीर करत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. आम्ही अनेक पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. काहीमध्ये यश आले तर काही अपयशी ठरल्या, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

काँग्रेसच्या जागा नंदूर बार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा- गोंदिया,गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि उत्तर मुंबई या 17 जागांवर काँग्रेल लढणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस बारामती, शिरूर, सातारा, भिंवडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड या 10 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढणार आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य या 21 जागा शिवसेना लढवणार आहे. शिवसेना 21 काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे, असे सजंय राऊत यांनी सांगितले.