धोकादायक होर्डिंग हटवा, पालिकेची पश्चिम रेल्वेला नोटीस

लोअर परळ येथील सेनापती बापट मार्ग येथे रखांगी चौक जंक्शन येथे रेल्वेच्या हद्दीत लावण्यात आलेल्या होर्डिंगमुळे  वाहतूकदार आणि रहिवाशांसाठी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हे धोकादायक हार्ंडग हटवावेत यासाठी पालिकेच्या वतीने पश्चिम रेल्वेला नोटीस बजावली आहे.

मुंबईत जोरदार वारा आणि पावसामुळे होर्डिंग कोसळण्याचा धोका असतो. दोन वर्षांपूर्वी पुण्यात जंक्शनवर होर्डिंग कोसळून 5 जण दगावले, तर मुंबईतही चर्चगेट स्टेशनजवळ होर्डिंग कोसळून एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे होर्डिंगच्या सुरक्षेबाबत पालिका जागरूक बनली आहे. यामध्ये लोअर परळ येथील फिनिक्स मॉल परिसरात पालिकेच्या हद्दीत हे धोकादायक होर्डिंग आहे. त्यामुळे हे होर्डिंग हटवण्यासाठी पालिकेच्या जी/दक्षिण लायसन्स इन्स्पेक्टरकडून ही नोटीस बजावण्यात आली होती.