आफ्रिकेत राष्ट्रीय आणीबाणी, ड्रग्ससाठी मेलेल्या माणसांच्या हाडांची चोरी

पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लियोन या देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झाली आहे. येथील पोलीस आता कब्रस्तानाच्या संरक्षणासाठी दिवसरात्र पहारा देत आहेत. झोंबी ड्रग्सच्या आहारी गेलेले तरुण कब्रस्तानात पुरलेले मृतदेह उकरून काढत मेलेल्या माणसांच्या हाडांची चोरी करीत आहेत. पश्चिम आफ्रिकेत झोंबी या अमली पदार्थांचा वापर गेल्या सहा वर्षांत कमालीचा वाढला आहे. या अमली पदार्थामध्ये हिपनोटिझम वाढविणारे घटक असतात. त्यामुळे माणूस कृत्रिम झोपेच्या आहारी जातो. त्याचा परिणाम शरीरावर काही तासांसाठी असतो. आफ्रिकेसाठी ही एक व्यापक समस्या बनली आहे. झोंबी हा अमली पदार्थ बनविण्यासाठी विविध प्रकारच्या विषारी पदार्थांची गरज आहे. मानवी हाडे हा त्यातील प्रमुख घटक आहे.
2020 ते 2023 दरम्यान या अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्यांपैकी रुग्णालयात भरती होणाऱयांचे प्रमाण तब्बल 4000 टक्क्यांनी वाढले आहे.