NCERT: बारावीच्या पाठ्यपुस्तकात मोठे बदल, बाबरीचा संदर्भ वगळला; रिपोर्ट

NCERT ने इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमध्ये पाच मोठ्या दुरुस्त्या केल्या आहेत, बाबरी पाडण्याचे संदर्भ वगळून आणि 1989 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर काँग्रेसच्या ‘पतनाचा’ उल्लेख केला आहे, असं वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे. 2014 पासून NCERT पाठ्यपुस्तके सुधारित किंवा दुरुस्त करण्याची ही चौथी वेळ आहे. ज्यामध्ये ‘तर्कसंगतता’ राखण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे आणि वादग्रस्त गोस्टी हटवल्या गेल्या आहेत. साथीरोगानंतर विद्यार्थ्यांवरील ओझे कमी करण्याच्या उद्देशाने अभ्यासक्रमात बदल करण्यात आले असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

शालेय शिक्षणाच्या गुणात्मक सुधारणेसाठीची धोरणे आणि कार्यक्रमांवर केंद्राला सल्ला देणाऱ्या सर्वोच्च शैक्षणिक संस्थेने – आर्य स्थलांतर सिद्धांतावर आधुनिक हिंदुस्थानची मुळं हडप्पा सभ्यतेशी जोडून, इयत्ता 12वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्येही सुधारणा केली आहे.

राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकाच्या 8 व्या अध्यायात, रामजन्मभूमी आंदोलन (बाबरीचे उल्लेख काढून टाकणे) आणि काँग्रेसची पडझड याचा समावेश करण्यासोबतच NCERT ने 1990 मंडल आयोग, 1991 पासून सुरू झालेल्या आर्थिक सुधारणांशी संबंधित सुधारणांचा आणि राजीव गांधींची हत्या यांचा समावेश केला आहे.

NCERT नुसार, ‘राजकारणातील ताज्या घडामोडींनुसार अभ्यासक्रम अपडेट केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निकालाने अयोध्येमधील बदल सुधारित करण्यात आला आहे’.

अयोध्या प्रकरण, आणि अन्य महत्त्वाचे मुद्दे, देशाच्या राजकारणातील अलीकडील पाच गंभीर घडामोडी म्हणून नोंदवण्यात आल्या आहेत. रिर्पोटमध्ये असं म्हटलं आहे की चार पानांचा एक भाग आहे ज्यामध्ये घटनांच्या क्रमाची उजळणी करण्यात आली आहे. बाबरीच्या विध्वंसानंतर झालेल्या जातीय हिंसाचाराला ‘दोन्ही बाजूंनी’ चालना देण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आल्याचं कळतं आहे.

NCERT ने अयोध्येतील घडामोडी ‘भाजपच्या उदयाशी आणि ‘हिंदुत्वा’च्या राजकारणाशी निगडीत असल्याचे म्हटले आहे’. या आणि इतर घटनांमध्ये बाबरी पाडल्याचा संदर्भ काढून टाकण्यात आला आहे.

इयत्ता 7 ते 10 च्या इतिहास आणि समाजशास्त्राच्या पुस्तकांमध्येही बदल करण्यात आले आहेत, इंडियन एक्स्प्रेसने NCERT च्या विधानाचा हवाला देत म्हटलं आहे की, सर्वात मोठा बदल, इयत्ता 12वीच्या पुस्तकात आहे, विशेषत: ‘Bricks, Beads, and Bones – The Harappan Civilisation’ या मथळ्याखाली करण्यात आला आहे.

हे बदल 2024/25 साठी लागू होतील आणि CBSE ला कळविण्यात आले आहेत आणि बदललेली पुस्तके या महिन्यात उपलब्ध होतील. सुमारे चार कोटी विद्यार्थी ही पुस्तके अभ्यासासाठी वापरतील.