हनीमूनसाठी गेले होते दाम्पत्य, नवरा गाडी बुक करायला गेला बायको झाली बेपत्ता

मध्य प्रदेशात एक अनोखी घटना घडली आहे. नवविवाहीत दाम्पत्य हनीमूनसाठी जयपूरला गेले होते. शनिवारी तिथे फिरत असताना दुपारी 3 च्या सुमारास दोघं हॉटेलमध्ये परतले. त्यानंतर खाट्यूश्यामाच्या दर्शनाला जाण्यासाठी पती कार बुक करायला बाहेर गेला आणि परतल्यानंतर त्याला पत्नी दिसली नाही. शोधाशोध करुनही ती न सापडल्याने अखेर त्याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. नंतर पोलिसांनी तपास सुरु केला आणि मुलीचे आई-वडिलही पोलीस ठाण्यात आलाे मात्र मुलीचा तपास सुरु आहे.

एएसआय बजरंग लाल शर्मा यांनी सांगितले की, भोपाळ येथील 24 वर्षाच्या तरुणाने पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल केली होती. 29 जुलै रोजी 22 वर्षीय तरुणीशी त्यांचे लग्न झाले, 5 ऑगस्टला दोघं हनिमूनसाठी जयपूरला गेले होते. सकाळी साधारण 10 वाजता जयपूरच्या झोटवाडा येथील चौमू पुलियाजवळील एका हॉटेलात थांबले होते. दुपारी जवळपास 12 च्या सुमारास दोघं आमेर फोर्ट फिरायला गेले होते. तिथे ती तास फिरल्यानंतर जेवून हॉटेलमधील रुममध्ये परतले. त्यानंतर दोघं खाट्यूश्यामाचे दर्शन करायला जाणार होते. त्यानंतर रुममध्ये पत्नीला सोडून तो कार ड्रायव्हरशी बोलायला गेला होता. जवळपास 15 मिनीटानंतर परत रूममध्ये आल्यावर पत्नी रुममध्ये नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी या लग्नाने आनंदी नव्हती. तिच्या कुटुंबियांनी तिची परवानगी न घेता लग्न ठरवले होते. त्यामुळे की निराश होती. तर दुसरीकडे पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तरुणीचा मित्र भीलवाडा येथून बेपत्ता आहे. दोघांचे फोनही बंद असून त्यांचा शोध सुरु आहे.